‘थर्टी फर्स्ट’ बंडखोरांच्या मनधरणीत? आमदारही मदतीला धावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:48 IST2026-01-01T10:47:13+5:302026-01-01T10:48:39+5:30
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कुणाला उमेदवारी देण्यात आली याबाबत भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड गुप्तता पाळली होती. त्यानंतरही बंडखोरी झाली. अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षातील आपल्या पदाचे राजीनामे दिले, तर इतरांनी थेट अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून आपला संताप व्यक्त केला.

‘थर्टी फर्स्ट’ बंडखोरांच्या मनधरणीत? आमदारही मदतीला धावले
सुजित महामुलकर -
मुंबई : भाजपने उमेदवारीबाबत प्रचंड गुप्तता पाळली होती. त्यानंतरही पक्षात लक्षणीय बंडखोरी झाली. ही बाब मारक ठरण्याची शक्यता असल्याने पक्षाच्या अनेक नेत्यांनी बुधवारी ‘थर्टी फर्स्ट’चा साजरा करण्याऐवजी बंडखोरांची समजूत काढण्यात दिवस खर्ची केला.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कुणाला उमेदवारी देण्यात आली याबाबत भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी प्रचंड गुप्तता पाळली होती. त्यानंतरही बंडखोरी झाली. अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षातील आपल्या पदाचे राजीनामे दिले, तर इतरांनी थेट अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून आपला संताप व्यक्त केला.
आमदारही मदतीला धावले
मुंबई भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी काही नाराज, तर काही ‘सौम्य’ बंडखोर उमेदवारांना चर्चा करण्यासाठी कार्यालयात बोलावले. या कामात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, तसेच अन्य काही नेत्यांचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये काही आमदारही पुढाकार घेत असून, उमेदवारी मागे घेण्याची शेवटची मुदत २ जानेवारी असल्याने आज ३१ डिसेंबर आणि नव्या वर्षाचा पहिला दिवस बड्या नेत्यांना बंडखोरांमागे खर्ची घालवावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.
अशा नाराज आणि बंडखोर उमेदवारांच्या भेटीगाठी भाजप नेत्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ बैठक आटोपल्यानंतर बुधवारी सांस्कृतिक कार्य मंत्री, मुंबई भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी दादरचे पक्ष कार्यालय गाठले.