मुंबई - वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकांवेळी राज्यात धुमाकूळ घातला होता. राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात आपला उमेदवार उभा करुन बहुतांश मते मिळविण्यात वंचित बहुजन आघाडीला यश आले आहे. तर, अनेक ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांची डोकेदुखी ठरण्याचं काम वंचितने केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने वंचितने तयारी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकांवेळी कपबशी या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आता निवडणूक आयोगाकडून चिन्ह देण्यात आलं आहे. आघाडीने वंचितला गॅस सिलेंडर हे चिन्हे दिले आहे. तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशिन हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये वंचितचे चिन्ह गॅस सिलेंडर हे असणार आहे.