नव्या वर्षांत येणार नव्या बनावटीच्या नॉन एसी लोकल; प्रवाशांच्या मृत्यूनंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:28 IST2025-06-10T10:28:08+5:302025-06-10T10:28:55+5:30

रेल्वे प्रशासनाला जाग

New non-AC local trains to arrive in the new year; After the deaths of passengers | नव्या वर्षांत येणार नव्या बनावटीच्या नॉन एसी लोकल; प्रवाशांच्या मृत्यूनंतर

नव्या वर्षांत येणार नव्या बनावटीच्या नॉन एसी लोकल; प्रवाशांच्या मृत्यूनंतर

मुंबई : लोकल प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जानेवारी २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत नवीन बनावटीच्या आणि स्वयंचलित दरवाजाच्या नॉन एसी लोकल दाखल होणार आहेत.

मध्य रेल्वेवर सोमवारी घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या (आयसीएफ) टीमबरोबर बैठक घेतली.

या बैठकीमध्ये मुंबईतील नॉन एसी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद होण्याच्या समस्येवर व्यावहारिक उपाय शोधणे हा यामागचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वयंचलित दरवाजांच्या नॉन-एसी लोकलमध्ये प्रवाशांना व्हेंटिलेशनअभावी त्रास होऊ शकतो हे गृहीत धरून या गाड्यांचे डिझाइन तयार केले जाणार आहे. या गाड्यांमध्ये खेळती हवा राहावी यासाठी प्रामुख्याने तीन बदल करण्यात येणार आहेत.

नव्या डिझाइनची पहिली ट्रेन नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार होईल. आवश्यक चाचण्या करून ती जानेवारी २०२६ पर्यंत सेवेत दाखल केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

असे असतील तीन प्रमुख बदल

लोकलच्या दरवाजांना जास्तीत जास्त हवेसाठी झापड असतील

ताजी हवा डब्यात खेचण्यासाठी त्याच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट असतील

डब्यांमध्ये वेस्टिब्यूल असतील जेणेकरून प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतील आणि गर्दीचे नैसर्गिक संतुलन साधू शकतील.

Web Title: New non-AC local trains to arrive in the new year; After the deaths of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.