नव्या महाव्यवस्थापकांचा प्रवाशांशी संवाद; प.रे. महाव्यवस्थापकपदी विवेक कुमार गुप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 07:12 IST2025-07-15T07:11:49+5:302025-07-15T07:12:24+5:30

गुप्ता यांनी चर्चगेट आणि मरिन लाइन्स स्थानकांवरील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि स्वच्छतेची पाहणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

New General Manager interacts with passengers; Vivek Kumar Gupta appointed as P.R. General Manager | नव्या महाव्यवस्थापकांचा प्रवाशांशी संवाद; प.रे. महाव्यवस्थापकपदी विवेक कुमार गुप्ता 

नव्या महाव्यवस्थापकांचा प्रवाशांशी संवाद; प.रे. महाव्यवस्थापकपदी विवेक कुमार गुप्ता 

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी भारतीय रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियरिंग (आयआरएसइ) १९८८ बॅचचे वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गुप्ता यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यापूर्वी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. गुप्ता यांनी पदभार सांभाळताच शनिवारी चर्चगेट आणि मरिन लाइन्स स्थानकांची पाहणी करून प्रवाशांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, सुधारणांबाबत काही सूचनादेखील केल्या. 

गुप्ता यांनी चर्चगेट आणि मरिन लाइन्स स्थानकांवरील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि स्वच्छतेची पाहणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हायड्रॉलिक बफरची तपासणी करा
चर्चगेट आणि मरिन लाइन्स या दोन्ही स्थानकांवर असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करण्याचे महाव्यवस्थापक गुप्ता 
यांना अधिकाऱ्यांना सांगितले. 
चर्चगेट स्थानकात काही वर्षांपूर्वी झालेल्या लोकल अपघाताच्या पार्श्वभूमीवर बसविण्यात आलेल्या हायड्रॉलिक बफरची तपासणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

एचएसएलव्ही पंख्यांची संख्या वाढवा
विवेक कुमार गुप्ता यांनी चर्चगेट स्थानकावर तपासणी केली असता या ठिकाणी लावण्यात आलेल्या एचएसएलव्ही पंख्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याने याबद्दल कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सध्या या ठिकाणी एचएसएलव्ही प्रकारचे ३ मोठे पंखे आहेत.

Web Title: New General Manager interacts with passengers; Vivek Kumar Gupta appointed as P.R. General Manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.