मराठीसाठी नवीन ‘डिजिटल’ व्यासपीठ

By admin | Published: June 27, 2017 03:36 AM2017-06-27T03:36:28+5:302017-06-27T03:36:28+5:30

मराठी नाटक, चित्रपट, मालिका; एवढेच नव्हे तर मराठी माणसाने सुरू केलेला कोणताही नवा उपक्रम किंवा व्यवसाय; किंवा अशा

New 'Digital' platform for Marathi | मराठीसाठी नवीन ‘डिजिटल’ व्यासपीठ

मराठीसाठी नवीन ‘डिजिटल’ व्यासपीठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी नाटक, चित्रपट, मालिका; एवढेच नव्हे तर मराठी माणसाने सुरू केलेला कोणताही नवा उपक्रम किंवा व्यवसाय; किंवा अशा कोणत्याही क्षेत्रातील मराठी माणसाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन ‘डिजिटल’ व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. टिष्ट्वटरच्या सहकार्याने सुरू झालेल्या या व्यासपीठाचे नामकरण ‘मराठी प्लॅनेट’ करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मराठी लोकांसाठी हे व्यासपीठ विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर हे या उपक्रमाची धुरा वाहणार आहेत. अक्षय बर्दापूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संकल्पना राबवली आहे. सोशल मीडियावर सुरू होत असलेल्या या उपक्रमाच्या अंतर्गत थेट चर्चाही घडवून आणल्या जाणार आहेत. यानिमित्ताने बोलताना महेश मांजरेकर यांनी, केवळ मराठी माणूस आणि त्याच्या उपक्रमासाठी हे व्यासपीठ असल्याचे स्पष्ट केले. मराठीत अनेक चित्रपट निर्माण होतात परंतु ते लोकांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करत या व्यासपीठावरून त्यांना सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: New 'Digital' platform for Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.