New airport transport system to be implemented at Mumbai airport, processing by AAI | मुंबईच्या विमानतळावर वाहतुकीची नवी प्रणाली होणार लागू, एएआयकडून प्रक्रिया सुरू

मुंबईच्या विमानतळावर वाहतुकीची नवी प्रणाली होणार लागू, एएआयकडून प्रक्रिया सुरू

मुंबई : मुंबईच्या हवाई हद्दीतील वाढत्या हवाई वाहतुकीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी नवीन हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात येईल. ती लागू झाल्यानंतर, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पूर्ण क्षमतेने (सध्या २४ तासांत सरासरी ९५० विमानांची वाहतूक केली जाते.) करणे सहज शक्य होईल, असा दावा करण्यात येत आहे.
नवीन प्रणाली सव्वा वर्षांत लागू होईल, असे सांगण्यात आले. एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडिया (एएआय)ने या संदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली. त्यामुळे पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाणाऱ्या विमानांची वाहतूक, मार्ग बदलल्याने मुंबईच्या हवाई हद्दीतून केली जात होती. नेहमीपेक्षा अधिक विमानांची भर पडल्याने हवाई हद्दीचे व्यवस्थापन करणाºया हवाई वाहतूक नियंत्रकांवरील कामाच्या ताणात प्रचंड वाढ झाली होती. सध्याची हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली जुनी झाल्याने तिच्यावर जास्त ताण टाकणे चुकीचे ठरत आहे. सुमारे १५ वर्षे ही प्रणाली वापरली जात असल्याने त्याची देखभाल करण्याचे कंत्राट संपुष्टात आले होते व त्यासाठी लागणाºया वस्तू मिळणे कठीण झाले होते.
पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर बंद झाल्यानंतर, मुंबईच्या हवाई हद्दीमधील विमानांच्या संख्येत ६० टक्के वाढ झाली होती. नवीन प्रणालीत हवेतील दोन विमानांमध्ये स्वयंचलित प्रकारे सुरक्षित अंतर ठेवण्याची सुविधा असेल. यामुळे हवाई हद्दीत सध्यापेक्षा अधिक विमानांची वाहतूक सहजशक्य होईल.

पहिला टप्पा ‘एटीसी’
पहिल्या टप्प्यात सध्याच्या एटीसी संकुलात प्रणाली लागू करण्यात येईल व दुसºया टप्प्यात टर्मिनल २ जवळ उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक एटीसी संकुलामध्ये ही प्रणाली लागू करण्यात येईल.

Web Title: New airport transport system to be implemented at Mumbai airport, processing by AAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.