Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : लाडक्या लेकीच्या साखरपुड्याच्या पार्टीत नीता अंबानींनी श्रीदेवीच्या गाण्यावर धरला ताल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 13:21 IST

या गाण्यावर नीता अंबानींनी केला धमाकेदार डान्स

मुंबई - मुंबापुरीमध्ये सध्या केवळ बॉलिवूडची मसकली गर्ल सोनम कपूर  आणि आनंद आहुजा यांच्या विवाहाची तर दुसरीकडे देशातील सर्वात श्रीमंत अंबानी कुटुंबाची लाडकी लेक ईशा अंबानी व आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याचीच चर्चा आहे. सोमवारी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटीलिया निवासस्थानी ईशा अंबानीच्या साखरपुड्याची पार्टी पार पडली. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूडमधील बादशाह शाहरुख खान, करण जोहर, रणबीर कपूर, आमीर खान याशिवाय स्पोर्ट्स विश्वातील सेलिब्रिटीदेखील हजर होते. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील पार्टीमध्ये उपस्थित होता. दरम्यान, अंबानी कुटुंबीयांच्या या विशेष कार्यक्रमात नीता अंबानी यांनी एक सोलो तसंच मुलगी ईशासोबतही डान्स फ्लोअरवर धमाका केला. त्यांचा हा डान्स फ्लोअरवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  नीता अंबानी यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या इंग्लिश-विंग्लिश सिनेमातील गाण्यावर डान्स केला. यावेळी मुकेश अंबानी डान्स फ्लोअरशेजारी उभे राहून त्यांना नीता अंबानी यांना चिअर करताना पाहायला मिळाले. यानंतर अभिनेत्री कतरिना कैफच्या ''नच दे ने सारे...'' या गाण्यावर नीता अंबानी यांनी मुलगी ईशासोबत ताल धरला. यावेळी मायलेकीमधील स्ट्राँग बाँडिंगची झलक पाहायला मिळाली. 

कधी आहे विवाहसोहळा?मुकेश अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानीचा डिसेंबर 2018 मध्ये विवाह उद्योगपती आनंद पीरामलसोबत पार पडणार आहे. आनंदनं ईशाला महाबळेश्वरमधील मंदिरात लग्नासाठी प्रपोज केले होते.  

 

टॅग्स :ईशा अंबानीमुकेश अंबानीसोशल मीडिया