राष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या; दाखवला इंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 15:30 IST2018-09-05T15:30:16+5:302018-09-05T15:30:28+5:30
भाजपा आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्याविरोधात आज मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या; दाखवला इंगा
मुंबई - भाजपा आमदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्याविरोधात आज मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींच्या वतीने भाजपा आमदार राम कदम यांच्या घरासमोर जोरदार घोषणा देत आणि त्यांच्या अटकेची मागणी करत राष्ट्रवादीच्या रणरागिणींनी चांगलाच इंगा दाखवला.
भाजपा आमदार रावण कदम यांच्या फोटोला काळं फासत आणि चपलांचा मारा करत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान आमदार राम कदम यांच्याविरोधात पोलीस केस दाखल करायला तयार नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनामध्ये आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, मुंबई समन्वयक मनीषा तुपे, जिल्हाध्यक्षा पुष्पा हरियन, डॉ. सुरैना मल्होत्रा, आरती साळवी, बिलकिश शेख, डॉ. रिना मोकल, स्वाती माने आदींसह असंख्य महिला, युवती सहभागी झाल्या होत्या.