Join us

मुंबईत राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का; सचिन अहिर आज करणार शिवसेनेत प्रवेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 07:00 IST

सचिन अहिर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अहिर यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेचं शिवबंधन हातात बांधणार आहेत. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करतील. 

सचिन अहिर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. अहिर यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. तसेच आघाडी शासनाच्या काळात त्यांच्यावर गृहनिर्माण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 

दरम्यान अहिर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यामध्ये भावनिक आवाहन करत मातोश्रीवर प्रवेशावेळी उपस्थित राहावं असं सांगितलं. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल असं मानलं जातं आहे. वरळीमध्ये सध्या सुनील शिंदे हे शिवसेनेचे आमदार आहेत.  

टॅग्स :शिवसेनासचिन अहिरराष्ट्रवादी काँग्रेस