Join us  

शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 2:21 AM

काँग्रेस हा या देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे. मात्र या पक्षाला सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे.

मुंबई, : काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत.काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

काँग्रेस हा या देशातील मोठा आणि जुना पक्ष आहे. मात्र या पक्षाला सध्या सक्षम द्रष्टे नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेसचे पानिपत झाले आहे. कधी काळी ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा काँग्रेस पक्ष आता १०० खासदार ही निवडून आणू शकत नाही. दलित बहुजनांचा विश्वास तुटल्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यामुळे काँग्रेस चे अध्यक्ष पद सांभाळण्यास कुणी पुढे येत नाही. अशा परिस्थितीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस मध्ये विलीन करून काँग्रेसचे अध्यक्षपद शरद पवार यांना बहाल करावे. माझ्या या सूचनेबाबतचा निर्णय सर्वस्वी काँग्रेस आणि शरद पवार यांनी घ्यावा,असेही आठवले पुढे म्हणाले.

टॅग्स :शरद पवारकाँग्रेसरामदास आठवलेराष्ट्रवादी काँग्रेस