Join us

सलमान अन् शिल्पा शेट्टीसह प्रफुल पटेल यांनीही धरला ठेका; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 14:32 IST

सध्या या लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचं लग्न जयपूरमध्ये पार पडलं. या लग्नासाठी म्हणजेच प्रजय पटेलच्या लग्नासाठी जयपूरमध्ये VIP पाहुणे आले होते. राजस्थानची राजधानी जयपूरच्या रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा झाला. या समारंभासाठी उद्योगपती अनिल अंबानी, गौतम अदाणी यांच्यासह बॉलिवूडच्या तारे-तारकांनी देखील उपस्थिती दर्शवली होती. तसेच विविध पक्षांचे नेतेही या समारंभसाठी आले होते.

सध्या या लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोठ्या कलाकरांनी या लग्नाला खास हजेरी लावल्याचं दिसून आलं आहे. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सलमान खान आणि शिल्पा शेट्टी, अनिल कपूरसोबत यांना देखील आमंत्रित केलं होतं. त्यामुळे कलाकारांनी लग्न सोहळ्याला हजेरी लावत चार चाँद लावले, ''जुम्मे की रात'' या गाण्यावर या कलाकारांसोबत प्रफुल पटेल यांनी देखील ठेका धरला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय हा सलमान खानचा फॅन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सलमान खानला या लग्नात बोलवण्यात आलं होतं. या शाही लग्नात शिवसेना नेते संजय राऊत, वेदांत रिसोर्सेज लिमिटेडचे संस्थापक अनिल अग्रवाल, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, जया बच्चन, डॉक्टर केतन देसाई आणि भाजपचे अनेक दिग्गज नेतेही उपस्थित राहिले होते.

टॅग्स :प्रफुल्ल पटेलसलमान खानशिल्पा शेट्टीराष्ट्रवादी काँग्रेस