Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं काढली आक्रोश रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 12:37 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने आज वडाळा परिसरात भव्य आक्रोश रॅली काढली. मोनोरेलचा दुसरा टप्पा लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज वडाळा परिसरात भव्य आक्रोश रॅली काढली. मोनोरेलचा दुसरा टप्पा लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनीही सहभाग नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली  ही आक्रोश रॅली काढण्यात आली होती. 

वडाळा ते जेकब सर्कल या मोनोरेलचा दुसरा टप्पा लवकरात लवकर सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात यावा. वडाळा, प्रतीक्षा नगर या भागातील लोकांसाठी ही मोनोरेल वाहतुकीसाठी उपयोगाची आहे. एमएमआरडीएने या टप्प्याला जास्त वेळ न घेता सुखकर प्रवासासाठी ही सेवा लगेच सुरू करावी, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली.

टॅग्स :मोनो रेल्वेराष्ट्रवादी काँग्रेस