मुंबई: मनात आणल्यास पुढील २ वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण होऊ शकतं. मात्र त्यासाठी संबंधितांनी स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारायला हवं, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. या कामाची आज पवारांनी पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंदु मिलचा निधी वाडिया रुग्णालयाला द्या : प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यापेक्षा तो निधी मुंबईतल्या वाडिया रुग्णालयाला द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर वाडियासाठी असलेला निधी रुग्णालय प्रशासनाला मिळेल. पण स्मारकं व्हायला हवीत, असं पवार यांनी म्हटलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी स्मारकाला विरोध दर्शवला आहे. स्मारकाला होणाऱ्या विरोधावर पवारांनी कोणाचंही नाव न घेता भाष्य केलं. प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण सगळ्यांचं ऐकायचं. त्यातून योग्य ते घ्यायचं आणि बाकीचं सोडून घ्यायचं, असं शरद पवार म्हणाले.
स्मारकाचा निधी वाडियाला द्या; प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर शरद पवार म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 17:38 IST