Join us  

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, नेमकं कारण काय? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 6:36 PM

Sharad Pawar Meets Uddhav Thackeray: मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर शेतीविषयक बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर शेतीविषयक बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरू आहे. गेल्या काही दिवसांतील दोन्ही नेत्यांमधली ही तिसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीमागचं नेमकं कारण काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (NCP Chief Sharad Pawar Meets CM Uddhav Thackeray in Mumbai)

दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील कृषी विषयक प्रश्नांवरुन चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यासोबतच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील समन्वय, सध्याची राजकीय स्थिती आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक यासह इतर राजकीय मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला स्वबळाचा नारा आणि पाळत ठेवल्याच्या वक्तव्यावरुन गेल्या काही दिवसांत जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचबरोबत राष्ट्रीय राजकारणात शरद पवार भाजपाला कट्टर प्रतिस्पर्धी निर्माण करण्यासाठी तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करत असल्याचीही चर्चा आहे. त्यासाठी पवारांच्या राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबतही भेटीगाठी सुरू होत्या. त्यामुळे याही विषयांवर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेस