नाणार प्रश्नी उद्या ‘जेल भरो’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:29 AM2018-07-15T06:29:51+5:302018-07-15T06:30:07+5:30

कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत (नाणार) सरकार आडमुठी भूमिका घेत आहे.

Nayar question tomorrow to 'Jail Bharo' | नाणार प्रश्नी उद्या ‘जेल भरो’

नाणार प्रश्नी उद्या ‘जेल भरो’

Next

मुंबई : कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत (नाणार) सरकार आडमुठी भूमिका घेत आहे. प्रकल्पग्रस्त व संघर्ष संघटनेसोबत सरकारची चर्चा बंद असताना; चर्चा केली जात असल्याची खोटी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिल्याचा आरोप कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केला. प्रकल्प रेटण्याच्या सरकारच्या पवित्र्याविरोधात सोमवारी मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
विधिमंडळात नाणार प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोकणवासीयांची सभा रविवारी परळ येथील शिरोडकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे वालम म्हणाले. तर, कोकणवासीयांना हा प्रकल्प नको आहे. त्यामुळे प्रकल्प रद्द करेपर्यंत लढा सुरूच राहील, असे संघर्ष संघटनेचे सत्यजीत चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Nayar question tomorrow to 'Jail Bharo'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.