नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:14 AM2018-01-29T06:14:19+5:302018-01-29T06:15:00+5:30

चलता है, ये हमारा रोज का काम है! असे सांगून एमआरआय कक्षात रुग्णाला आॅक्सिजन सिलिंडरसह घेऊन जाण्याची परवानगी देणा-या वॉर्डबॉयच्या निष्काळजीपणामुळे तरुण नातेवाईकाचा हकनाक बळी गेला.

 Nayar hospital gets trapped in MRI machine | नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

Next

मुंबई - चलता है, ये हमारा रोज का काम है! असे सांगून एमआरआय कक्षात रुग्णाला आॅक्सिजन सिलिंडरसह घेऊन जाण्याची परवानगी देणा-या वॉर्डबॉयच्या निष्काळजीपणामुळे तरुण नातेवाईकाचा हकनाक बळी गेला. मुंबईतील नायर रुग्णालयात शनिवारी रात्री ही घटना घडली.
राजेश मारू (३२) त्याच्या बहिणीच्या सासूला बघण्यासाठी रुग्णालयात गेला होता. रुग्णाला एमआरआय करण्यासाठी तो घेऊन गेला. तेथील कर्मचाºयांनी त्याला एमआरआय कक्षात रुग्णासाठी आॅक्सिजन सिलिंडर आणण्यास सांगितले. एमआरआय मशिन बंद असल्याने लोखंडी सिलिंडर नेण्यास हरकत नाही, असेही ते म्हणाले. मात्र मशिन सुरूच असल्याने तो सिलिंडरसह मशिनमध्ये ओढला गेला. त्यातच सिलिंडरचा व्हॉल्व लीक झाला, आॅक्सिजन बाहेर येत असतानाच राजेशचा हात मशिनमध्ये अडकला. कर्मचाºयांनी त्याला बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता. प्रशिक्षणार्थी डॉक्टर सौरभ लांजेकर (२४) यांच्याकडे एमआरआय कक्षाची जबाबदारी होती. मात्र ते हजर नव्हते. वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण (३५), परिचारिका व अन्य कर्मचाºयांनी रुग्णाच्या नातेवाईकांनाच इतर सर्व कामे सांगितली, असे राजेशच्या कुटुंबीयांनी सांगितले. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. लांजेकर व वॉर्ड बॉय विठ्ठल चव्हाण यांना अटक केली आहे.

वरिष्ठांवर कारवाईची मागणी : लांजेकर हे प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत. त्यामुळे विभाग प्रमुख व जबाबदार डॉक्टर व कर्मचाºयांवरही कारवाई करण्याची मागणी राजेशच्या कुटुंबीयांनी केली आहे.

मुख्यमंत्री निधीतून
मदत
मुख्यमंत्री सहायता
निधीतून या दुर्घटनेत बळी पडलेल्या राजेश मारुच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.

निष्पक्ष चौकशीची मागणी

नायर हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे रुग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. सरकारने सखोल व निष्पक्ष चौकशी करावी. दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.
आमदार लोढा आणि स्थानिक नगरसेविका
सुरेखा लोखंडे यांनी रविवारी नायर रुग्णालय अधिष्ठात्यांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले.
दोषींचे निलंबन आणि मारू यांच्या कुटुंबातील एका सदस्याला रुग्णालयातच नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिल्याबद्दल लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

आम्ही मारू कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. भविष्यात दुर्घटना घडणार नाहीत, याची आम्ही खबरदारी घेऊ. चौकशी करून कुटुंबीयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- डॉ. सुनील धामणे,
उपायुक्त, आरोग्य विभाग,
मुंबई महापालिका
सीसीटीव्ही फुटेज पाहत आहोत. या प्रकरणी योग्य कारवाई केली जाईल.
- डॉ. रमेश भारमल,
अधिष्ठाता, नायर रुग्णालय

Web Title:  Nayar hospital gets trapped in MRI machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू