Join us  

नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, 21 डिसेंबरला ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 2:45 PM

कसलेला अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मुंबई - कसलेला अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. नेहमीच आव्हानात्मक भूमिका स्विकारणा-या नवाजुद्दीनसाठी ही भूमिकाही तितकीच आव्हानात्मक असणार आहे यात काही वाद नाही. हा एक चरित्रपट असणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत या चित्रपटाचं लिखाण करत आहेत. 

नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारणार असल्याने आधीच उत्सुकता वाढली आहे. संजय राऊत यांना नवाजुद्दीनच्या भूमिकेबद्दल विचारलं असता, 21 डिसेंबरला सिनेमाचा ट्रेलर रिलीज होईल. तेव्हाच बघा असं त्यांनी सांगितलं. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजसाठी बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

यापूर्वी मराठीत संजय राऊत यांनी 'बाळकडू' हा मराठी चित्रपट बनविला होता. मात्र, त्यात मराठी तरूणाला बाळासाहेबांपासून प्रेरणा कशी मिळते व त्याच्या चेतना जाग्या कशा होतात हे दाखविण्यात आले होते. बाळकडू हा चित्रपट बायोपिक गटात मोडणारा नव्हता. तसंच चित्रपटात फक्त बाळासाहेबांचा आवाज वापरण्यात आला होता. पण यावेळी हिंदी चित्रपटात नवाजुद्दीन त्यांची भूमिका साकारणार असल्याने प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबाळासाहेब ठाकरेसंजय राऊत