Join us

वरातीतून नवरदेव थेट पोलिसांच्या कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 00:51 IST

मुंबई एका महिलेचा मोबाइल हिसकावून पसार झालेल्या चोराला लग्नाच्या वरातीतूनच पोलिसांनी अटक केली.

मुंबई एका महिलेचा मोबाइल हिसकावून पसार झालेल्या चोराला लग्नाच्या वरातीतूनच पोलिसांनी अटक केली. टिळकनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हा चोरटा लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकला आहे. चेंबूरमधील अमर महल जंक्शन येथून २६ नोव्हेंबरला सोमवारी सकाळी अश्विनी पिवेकर ही मुलीला घेऊन जात होती. त्याच दरम्यान बाइकवर दोन लुटारूंनी त्यांच्या हातातून मोबाइल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी याचा तपास हाती घेतल्यानंतर ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.पोलिसांनी त्यांच्या खबºयांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेजवरूनत्यांची ओळख पटवली. त्यानुसार अजय धोटे (२३) आणि अल्ताफ मिर्झा (२३) हे चोर शिवाजीनगरमध्ये राहत असल्याचे पोलिसांना समजले. या माहितीच्या आधारे त्यांना अटक करण्यासाठी २८ नोव्हेंबरलापोलीस शिवाजीनगर येथे आले. दरम्यान, त्याच दिवशी अजयनेवांद्रे कोर्टात लग्न करून शिवाजीनगरमध्ये वरात काढली. या वरातीत त्याचा मित्र अल्ताफ हा आनंदाने नाचत होता. या लग्नसराईच्या आनंदात असतानाच क्षणातच पोलिसांनी वरातीतसहभागी झालेल्या नातेवाइकांना कळण्याच्या आतच अजयआणि अल्ताफला अटककेली. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.आरोपींनी पिवेकर यांचा मोबाइल महंमद बिलाल जलालुद्दीन शेख (२५) याला विकण्यात आल्याचे सांगितले. त्याला पोलिसांनीअटक करून त्याच्याविरोधातहीगुन्हा दाखल केला आहे.अशाच पद्धतीचे ३ गुन्हे अजयविरोधात दाखल असून आणखी काही चोºया केल्याची कबुली देत गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :तुरुंग