Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिकांना होमग्राउंडवर मोठा धक्का! 'कॅप्टन'चा पत्ता कट; कुर्ल्यात काँग्रेसच्या अश्रफ आजमींनी मारली बाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:01 IST

मुंबईत भाजप आणि शिवसेना यांची युती आणि ठाकरे बंधूंची आघाडी यांच्यात 'कांटे की टक्कर' पाहायला मिळत असतानाच, कुर्ल्यातून एक अत्यंत धक्कादायक निकाल समोर आला आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या रणसंग्रामाचा निकाल आज जाहीर होत असून, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत सुरुवातीच्या कलानी मोठी खळबळ उडवून दिली आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेना यांची युती आणि ठाकरे बंधूंची आघाडी यांच्यात 'कांटे की टक्कर' पाहायला मिळत असतानाच, कुर्ल्यातून एक अत्यंत धक्कादायक निकाल समोर आला आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) वजनदार नेते नवाब मलिक यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला असून, त्यांचे बंधू कॅप्टन मलिक यांचा दारूण पराभव झाला आहे.

कुर्ल्यात काँग्रेसचा 'हात' भारी! 

प्रभाग क्रमांक १६५ (कुर्ला पश्चिम) मध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. येथे काँग्रेसचे उमेदवार अश्रफ आजमी यांनी ७,७८२ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांनी केवळ राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच नाही, तर भाजपच्या तगड्या उमेदवारालाही धूळ चारली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

अशी राहिली मतांची आकडेवारी:

अश्रफ आजमी (काँग्रेस): ७,७८२ मते (विजयी)

रुपेश नारायण पवार (भाजप): ७,२२७ मते

कॅप्टन मलिक (राष्ट्रवादी): ४,८६३ मते

नवाब मलिकांच्या प्रतिष्ठेला तडा? 

नवाब मलिक यांचे बंधू कॅप्टन मलिक हे या प्रभागातून अनुभवी उमेदवार मानले जात होते. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारत तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. भाजपचे रुपेश पवार यांनी आजमी यांना चांगली टक्कर दिली, मात्र ५५५ मतांच्या फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मलिकांच्या कुटुंबातील सदस्याचा झालेला हा पराभव राष्ट्रवादीसाठी आणि विशेषतः नवाब मलिकांसाठी मोठा राजकीय झटका मानला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nawab Malik's Brother Loses Kurla Election; Congress Wins Big

Web Summary : In a Mumbai municipal election shocker, Nawab Malik's brother lost in Kurla. Congress' Ashraf Azmi secured a decisive victory, defeating both Nationalist Congress Party and BJP candidates. This defeat is a setback for Malik's political influence.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६नवाब मलिककाँग्रेस