Join us

कोर्टाचा आदेश धुडकावून समीर वानखेडेंवर केलेली टीका भोवली, नवाब मलिकांनी हायकोर्टाची बिनशर्त माफी मागितली   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 19:15 IST

Nawab Malik: हायकोर्टाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक Sameer Wankhede यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत बिनशर्त माफी मागितली आहे.

मुंबई - एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई हायकोर्टाची माफी मागितली आहे. या प्रकरणात हायकोर्टाने फटकारल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत बिनशर्त माफी मागितली आहे. तसेच आता समीर वानखेडे यांच्याविरोधात कुठलेही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विधान करणार नाही, अशी हमी नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबई हायकोर्टासमोर दिली.

नवाब मलिक यांना मुद्दामहून आपल्याच जबाबाच्या विरोधात जात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात टिप्पणी केली होती, असे मुंबई हायकोर्टाचे मत पडले. या प्रकरणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली होती. ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्या प्रकरणी सुनावणीवेळी नवाब मलिक यांनी कोर्टाला समीर वानखेडेंविरोधात कुठलेही वक्तव्य करणार नसल्याची हमी दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी समीर वानखेडेंबाबत वक्तव्य केले होते. मात्र आता त्यासाठी त्यांना माफी मागावी लागली आहे. 

नवाब मलिक यांनी सांगितले की, मी माझ्याच जबाबाविरोधात गेल्या प्रकरणात माफी मागत आहेत. कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यामुले माझ्याकडून कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन झाले. मला वाटले की त्यांची मुलाखत कोर्टाकडून देण्यात आलेल्या जबाबाच्या कक्षेबाहेर आहे. दरम्यान, त्यांनी मुलाखतीमध्ये दिलेला उत्तर हे कोर्टात दिलेल्या जबाबाच्या कक्षेमध्ये येते, असे त्यांना सांगण्यात आले .

टॅग्स :नवाब मलिकसमीर वानखेडेमुंबई हायकोर्ट