Join us  

Nawab Malik : मुंबईत भाडेकरूचे मालक व्हा, मुख्यमंत्री ठाकरेंनी नवीन GR काढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 6:39 PM

नवाब मलिक यांनी या आरोपांच्या समर्थ जे सांगितले त्यामध्ये ते म्हणतात की त्या जागेत आमची दुकाने होती त्यासह संपूर्ण कंम्पाऊंची मालकी मिळवली. तेही 30 लाख ठरवून 20 लाख एवढ्या कवडीमोल किमंतीत मालकी मिळवली

ठळक मुद्देमुंबईत प्रत्येक भाडेकरूला आपल्या जागेच्या किंमतीच्या 10 टक्के पैसे भरा आणि केवळ आपल्या गाळ्याचे जागेचे नाही तर इमारतीचे मालक व्हा, असा जीआरच काढून टाकावा, असा उपरोधात्मक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच मलीक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा पलटवार भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच, जर मलिकांवरील आरोप खोटे वाटत असतील तर मुंबईतील भाडेकरूंसाठी एक शासन निर्णय काढा, असेही शेलार यांनी सूचवले आहे. 

नवाब मलिक यांनी या आरोपांच्या समर्थ जे सांगितले त्यामध्ये ते म्हणतात की त्या जागेत आमची दुकाने होती त्यासह संपूर्ण कंम्पाऊंची मालकी मिळवली. तेही 30 लाख ठरवून 20 लाख एवढ्या कवडीमोल किमंतीत मालकी मिळवली. मुंबईततील हे कसले "नवाबी भाडेकरु ?"  ज्यांना सरकारी दरापेक्षा कमी दरात जागेची मालकी मालकाने दिली, असा प्रश्न शेलार यांनी विचारला आहे. 

मुंबईतील भाडेकरुंचा प्रश्न एवढ्या सहजपणे सुटत असेल तर मग मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जीआर काढून वर्षानुवर्षे न्यायालयात लढणाऱ्या मुंबईतील भाडेकरुंना हाच नियम लावावा, अशी उपरोधिक मागणी ही आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. हे जे समोर मांडून ठेवलंय ते जर खोटंय असं वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी एक शासन निर्णयच काढावा. यापुढे मुंबईत प्रत्येक भाडेकरूला आपल्या जागेच्या किंमतीच्या 10 टक्के पैसे भरा आणि केवळ आपल्या गाळ्याचे जागेचे नाही तर इमारतीचे मालक व्हा, असा जीआरच काढून टाकावा, असा उपरोधात्मक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

मुंबईतील खाजगी जागेवरील झोपडपट्टीची मालकी देण्यासाठी आज सुध्दा सरकार रेडीरेकनरच्या 25% रक्कम जमा करुन घेते मग नवाब मलिक यांना एवढी जागा कशी काय हस्तांतरीत करुन मिळाली असा सवाल करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी या व्यवहारातील सांगितल्या जाणाऱ्या हास्यास्पद बाबी समोर आणल्या. 

वॉचमनला नवाबी धंदा का सांगताय?

या व्यवहारात सरदार शहावल्ली याचे वडील वाँचमेन असल्याने त्यांनी आपले नाव जागेला चढवले म्हणून त्याला पैसै दिले. मग हा मुंबईतील वॉचमनला नवा नवाबी धंदा सांगताय का? असा सवाल करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी नवाब मलिक सांगत असलेल्या नवाबी दर, नवाबी धंदे, नवाबी व्यवहार, नवाबी भाडेकरु, नवाबी मालक याची खिल्ली उडवली. तसेच हा विषय एवढा सरळ नसून मुंबईला 1993 ला बाँम्ब स्फोट झाले आणि त्यातील दोषी आरोपींना मदत करण्यासाठी 2005 ला हे व्यवहार झालेले असल्याने हा विषय गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी कराली अशी मागणी सुध्दा आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाद्ये, प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय उपाध्याय भाजपा नगरसेवक. संदिप लेले आदी उपस्थितीत होते. 

टॅग्स :नवाब मलिकउद्धव ठाकरेमुंबईआशीष शेलार