नवनीत राणांच्या वडिलांना दिलासा नाहीच, अपील फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 06:49 IST2023-02-18T06:49:11+5:302023-02-18T06:49:32+5:30

त्यानंतर राणा यांच्या वडिलांनी सत्र न्यायालयात धाव घेतली

Navneet Rana's father is not relieved, the appeal is rejected | नवनीत राणांच्या वडिलांना दिलासा नाहीच, अपील फेटाळले

नवनीत राणांच्या वडिलांना दिलासा नाहीच, अपील फेटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांना दंडाधिकाऱ्यांनी फरारी घोषित केले. याविरोधात राणांच्या वडिलांनी केलेले अपील सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळले. अनेकवेळा समन्स बजावूनही राणा यांचे वडील हरभजन कुंडलेस न्यायालयात हजर न राहिल्याने दंडाधिकारी न्यायालयाने गेल्याच महिन्यात त्यांना फरारी म्हणून घोषित केले.

त्यानंतर राणा यांच्या वडिलांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. दोन्ही बाजू ऐकल्यावर न्या. संतोष कुलकर्णी यांनी राणांच्या वडिलांचे अपील फेटाळले. 

Web Title: Navneet Rana's father is not relieved, the appeal is rejected