Navi Mumbai Airport: मोठी बातमी! नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद आता राज ठाकरेंच्या कोर्टात, भाजप आमदार 'कृष्णकुंज'वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:32 PM2021-06-21T12:32:21+5:302021-06-21T12:40:34+5:30

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे. तर शिवसेनेनं विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे

Navi Mumbai airport naming controversy bjp mla prashant thakur meet Raj Thackeray | Navi Mumbai Airport: मोठी बातमी! नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद आता राज ठाकरेंच्या कोर्टात, भाजप आमदार 'कृष्णकुंज'वर

Navi Mumbai Airport: मोठी बातमी! नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद आता राज ठाकरेंच्या कोर्टात, भाजप आमदार 'कृष्णकुंज'वर

Next

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे. तर शिवसेनेनं विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे. त्यात कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्यानं बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर आज नवी मुंबईचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर आणि महेश बालदी आज मुंबईत 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. Navi Mumbai airport naming controversy bjp mla prashant thakur meet Raj Thackeray

नवी मुंबई विमानतळ: मुख्यमंत्री देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम, बैठक निष्फळ; वाद चिघळणार

भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर आणि विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी केलेली आहे. तर शिवसेनेनं बाळासाहेबांचं नाव देण्यावर ठाम भूमिका घेतल्यानं वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरुन प्रशांत ठाकुर आज राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या वादावर मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. 

कृती समितीच्या ठरावाला मुख्यमंत्र्यांनी दिली बगल
लोकनेते दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत दिबांच्या नावाला पाठिंबा दर्शविणारे स्थानिक ग्रामपंचायती तसेच विविध प्राधिकरणाचे ठराव मुख्यमंत्र्याना सादर केले होते. या ठरावांची देखील दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. विशेष म्हणजे तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतल्यास शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरतील अशी भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरल्याने अशाप्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकुर यांनी केला आहे. कृती समितीच्या माध्यमातुन येत्या २४ तारखेला सिडकोला घेराव घालण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे.

Web Title: Navi Mumbai airport naming controversy bjp mla prashant thakur meet Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.