नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 22:09 IST2026-03-30T22:07:57+5:302026-03-30T22:09:25+5:30
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर! भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत घोषणा
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समिती'ची नवनियुक्त कार्यकारिणी सोमवारी जाहीर करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या घोषणा झाल्या.
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस रूपेश धुमाळे, योगेश आवळे, उपाध्यक्ष साई घोगळे, सचिव शरद येटम, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र राऊत आणि निशांत गायकवाड उपस्थित होते.
कोणावरही अन्याय होऊ देणार नाही" – रवींद्र चव्हाण
यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देणे हे आमचे ध्येय आहे. शासन आणि प्रशासनाच्या समन्वयातून सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायचे आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि आम्ही तो खपवूनही घेणार नाही, याच भूमिकेतून आम्ही काम करत आहोत."
नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समिती
संयुक्त सरचिटणीस: रूपेश धुमाळे
उपाध्यक्ष: किरण पवार, युहान केर्सी दोराबाजी, सुजित न्यायनिर्गुणे
सचिव: प्रभुदास भोईर, मुखांश नाईक, गजानन पाटील
अखिल भारतीय माथाडी संघटना कार्यकारिणी
याच कार्यक्रमात अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणी घोषीत झाली. त्यात रायगड जिल्हा अध्यक्षपदी जितेश शिंदे, भिवंडी पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी सचिन जोशी, ठाणे उरण उपाध्यक्षपदी विक्रांत भोसले, दक्षिण मुंबई उपाध्यक्षपदी राहुल लहासे , वरळी विधानसभा अध्यक्षपदी शैलेश तोडकरी आणि वरळी विधानसभा सरचिटणीस पदी समीर शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.