Join us  

राज्यभरात ९ हजार ९६७ रुग्णांना नवजीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 6:59 AM

मुंबईतील अरुंद रस्ते, रेल्वे स्थानकांलगतचा परिसर या ठिकाणाहून बाइक अ‍ॅम्ब्युलन्ससाठी मोठ्या प्रमाणात

स्नेहा मोरे 

मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मुंबई आणि राज्याच्या अन्य काही जिल्ह्यांत गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात बाइक अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यात आली. १४ महिन्यांत राज्यभरातील पाच जिल्ह्यांमधील ३० बाइक अ‍ॅम्ब्युलन्सने जवळपास १० हजार रुग्णांना नवजीवन दिले आहे.

मुंबईतील अरुंद रस्ते, रेल्वे स्थानकांलगतचा परिसर या ठिकाणाहून बाइक अ‍ॅम्ब्युलन्ससाठी मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत. ही मोफत सेवा असून १०८ या क्रमांकावर उपलब्ध आहे. डोंगराळ भागात जिथे चारचाकी रुग्णवाहिका नेणे अशक्य आहे त्या ठिकाणी या बाइक अ‍ॅम्ब्युलन्सने सहजरीत्या पोहोचणे शक्य आहे. याचा विचार करून राज्यातील मुंबई, पालघर, अमरावती, सोलापूर आणि गडचिरोली अशा दुर्गम भागांत ही सेवा देण्यात येत आहे. बाइकचे चालक हे स्वत: डॉक्टर असल्यामुळे रुग्णांवर लगेचच प्रथमोपचार करून प्लॅटिनम मिनिट्समध्ये उपचार देत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.अपघात रुग्णसंख्यावाहन अपघात ३८५मारहाण २८भाजलेले रुग्ण ११हृदयविकार ८८पडणे २४८विषबाधा १३प्रसूती १७३वीज पडणे १२मोठ्या दुर्घटना २४अन्य वैद्यकीय ५,०१९विविध जखमा ४४२आत्महत्या ५अन्य ३,५१९एकूण ९,९६७जिल्हा बाइक अ‍ॅम्बुलन्स संख्यामुंबई १८पालघर ५अमरावती ५जिल्हा बाइक अ‍ॅम्बुलन्स संख्यासोलापूर १गडचिरोली १एकूण ३०

टॅग्स :महाराष्ट्रमुंबईआरोग्य