कोकण कन्या आणि मांडवी एक्स्प्रेसमधून घडणार निसर्गाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 05:02 IST2019-01-23T05:01:46+5:302019-01-23T05:02:15+5:30

कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसप्रमाणेच डेक्कन, पंचवटी, कोकण कन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच बसविण्यात येणार आहेत.

Nature will be seen from Konkan and Mandvi Express | कोकण कन्या आणि मांडवी एक्स्प्रेसमधून घडणार निसर्गाचे दर्शन

कोकण कन्या आणि मांडवी एक्स्प्रेसमधून घडणार निसर्गाचे दर्शन

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसप्रमाणेच डेक्कन, पंचवटी, कोकण कन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना निसर्गाचे दर्शन घडेल. विस्टाडोम कोचमुळे प्रवाशांना रोप-वेमधून फिरल्याचा अनुभव येणार आहे.
विस्टाडोम कोचमध्ये चारही बाजूने पारदर्शक काचा असलेल्या मोठ्या खिडक्या आणि छत बसविण्यात येते. त्यामुळे आजूबाजूचा परिसर पाहता येतो. मुंबई ते मडगाव धावणाºया कोकण कन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच बसविण्यात येतील. त्यामुळे कोकणातील हिरवळीचा अनुभव प्रवाशांना घेता येईल. यासह मुंबई ते पुणे जाणाºया डेक्कन एक्स्प्रेसमधून सह्याद्रीच्या रांगेचे दर्शन घडेल. मुंबई ते नाशिक पंचवटी एक्स्प्रेसलाही विस्टाडोम कोच बसविण्यात येणार असल्याने प्रवास आल्हादायक होईल.
काचेच्या मोठ्या खिडक्या, पारदर्शक छत, आकर्षक रंग, नावीन्यपूर्ण अंतर्गत सजावट, आरामदायी आसन व्यवस्था, सर्व डब्यांमध्ये जैव तंत्रज्ञानयुक्त स्वच्छतागृहे, सध्याच्या तुलनेत डब्यांमध्ये दोन मीटर अधिक लांब जागा अशा सुविधा प्रवाशांना मिळतील. शिवाय दरवाजे अधिक रुंद तर डबे वजनाने हलके असल्याने रुळावरून जाताना गाडीचा घसाराही कमी होईल. अद्ययावत ब्रेक सिस्टीमही या एक्स्प्रेसमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>सेल्फीसाठी विशेष व्यवस्था
विस्टाडोम कोचमध्ये एकूण ४० आसने असून, ही आसने ३६० अंशात फिरतात, तसेच कोचच्या शेवटी मोकळी जागा ठेवून प्रवाशांना फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी विशेष व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये विस्टाडोम कोच बनविण्यात येत आहेत. हे कोच वातानुकूलित असल्याने याचे भाडे अधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात टिष्ट्वट केले आहे. कालका-शिमला, मुंबई-गोवा आणि विजाग-अराकू घाट मार्गावर स्वच्छ आणि आधुनिक विस्टाडोम कोच गाड्या सुरू केल्याने नैसर्गिक सौंदर्य पाहता येत आहे, असे त्यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.

Web Title: Nature will be seen from Konkan and Mandvi Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.