Join us

टपाल कर्मचाऱ्यांचे आज देशव्यापी धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:40 IST

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी बुधवारी जीपीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी बुधवारी जीपीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील टपाल खात्याच्या विविध सर्कल कार्यालयासमोर टपाल कर्मचारी धरणे करणार आहेत.बुधवारी सकाळी धरणे आंदोलन सुरु होईल. कामगार भरती, ग्रामीण डाक सेवक यांना खात्यामध्ये समाविष्ट करावे, नवीन पेन्शन योजना बंद करुन जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. सायंकाळी जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनचे महाराष्ट्र व गोवा सर्कलचे अध्यक्ष बाळकृष्ण चाळके यांनी दिली.

टॅग्स :पोस्ट ऑफिस