Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या कांदा उत्पादकाला पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:56 IST

पंतप्रधानांना मनीआॅर्डर करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा आहे.

मुंबई : कांद्याच्या विक्रीतून आलेल्या १,०६४ रुपयांची थेट पंतप्रधानांना मनीआॅर्डर करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा आहे. २२ एप्रिलला पिंपळगाव येथील सभास्थळी पंतप्रधानांना भेटून त्यांच्या कानावर कांदा उत्पादकांची व्यथा घालावी, असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.साठे यांनी एकूण ५० क्विंटल उत्पादन घेतले होते, मात्र त्यातील बहुसंख्य कांदा त्यांनी नोव्हेंबरआधीच विकल्याने त्यांना अनुदानाचा मोठा लाभ झाला नाही.

टॅग्स :शेतकरी