नंदकुमार काटकर यांची मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सहकार विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी आहे.
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या श्री. नंदकुमार काटकर यांनी गेली अनेक दशके मुंबई शहरातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ते गेल्या २५ वर्षांपासून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. याशिवाय, त्यांनी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
मुंबई शहराच्या सहकार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा असून, या क्षेत्रातील प्रमुख आधारस्तंभ म्हणून त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई कार्याध्यक्ष श्री. सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस श्री. शिवाजीराव गर्जे , श्री. संतोष धुवाळी, प्रवक्ते श्री. संजय तटकरे, जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र पानसरे, श्री. अर्शद अमीर सय्यद, दक्षिण मुंबई महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती स्मिता अंजर्लेकर तसेच पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.