उत्तर मुंबईत ‘नमो नेत्र चिकित्सा’ अभियानाला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 19:36 IST2025-09-28T19:35:55+5:302025-09-28T19:36:23+5:30
नागरिकांनी उत्साहाने या शिबिरांमध्ये सहभाग घेतला आणि या सेवांचा लाभ घेतला.

उत्तर मुंबईत ‘नमो नेत्र चिकित्सा’ अभियानाला मिळाला उस्फूर्त प्रतिसाद
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत, उत्तर मुंबईच्या सर्व ४२ प्रभागांमध्ये ‘नमो नेत्र चिकित्सा’ शिबिरे केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली गेली. ही मोहीम आज यशस्वीपणे संपन्न झाली. शिबिरांमध्ये मोफत डोळे तपासणी, ४२,००० चष्मे वाटप करण्याचा आराखडा (प्रत्येक प्रभागात सुमारे १००० चष्मे), मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड इत्यादी सेवा प्रदान केल्या गेल्या.
ही शिबिरे दहिसर विधानसभा (पश्चिम, मध्य, पूर्व), बोरीवली विधानसभा (पश्चिम, पूर्व), मागाठाणे विधानसभा (उत्तर, मध्य, दक्षिण), कांदिवली पूर्व विधानसभा, चारकोप विधानसभा आणि मालाड पश्चिम विधानसभा येथे आयोजित करण्यात आली होती. नागरिकांनी उत्साहाने या शिबिरांमध्ये सहभाग घेतला आणि या सेवांचा लाभ घेतला.
या उपक्रमाबाबत बोलताना पीयूष गोयल यांनी सांगितले की, आरोग्यदायी आणि आनंदी जीवनासाठी निरोगी डोळे अत्यंत महत्वाचे आहेत; त्यासाठी लवकर ओळख, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. त्यांनी या शिबिरांमध्ये डॉक्टर, पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांचा पावसातही केलेल्या प्रयत्नांसाठी आभार मानले. हा अभियान उत्तर मुंबईतील नागरिकांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि ‘लोकसेवा’ या भावना साकारतो असे ते म्हणाले.
या प्रसंगी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, मनीषा चौधरी, अतुल भातखवेकर, संजय उपाध्याय, प्रवीण दरेकर; माजी मंत्री विजय गिरकर, भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबईचे अध्यक्ष दीपक (बाळा) तावडे, उत्तर मुंबई जिल्हा महामंत्री सत्यप्रकाश (बाबा) सिंह, निखिल व्यास, सर्व माजी नगरसेवक तसेच सर्व वॉर्ड अध्यक्ष आणि वरिष्ठ जिल्हा अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.