name of mumbais New Police Commissioner announced today | नवीन पोलीस आयुक्तांची आज घोषणा

नवीन पोलीस आयुक्तांची आज घोषणा

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे शनिवारी निवृत्त होत असून त्यांच्यानंतर कोण, याची निश्चिती शुक्रवार रात्रीपर्यंत झाली नव्हती. शनिवारी सकाळी त्याबाबतचा आदेश जारी केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. नव्या आयुक्तांच्या नावाबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग, सुरक्षा महामंडळ महासंचालक डी. कनकरत्नम, अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ ही नावे चर्चेत आहेत. बर्वे यांना शनिवारी मुंबई पोलीस दल निरोप देईल. सिंग यांचे नाव आघाडीवर आहे, सरकारला सेठ यांची नियुक्ती करायची झाल्यास आयुक्त पदाचा दर्जा कमी करावा लागेल.

Web Title: name of mumbais New Police Commissioner announced today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.