पालिकेकडून नालेसफाईचे काम धिम्या गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 06:15 AM2019-04-22T06:15:49+5:302019-04-22T06:16:02+5:30

पावसाळ्याला अवघे दोन महिने उरले असताना नालेसफाई यावर्षीही धिम्या गतीनेच सुरु असल्याचे चित्र आहे.

Nalasaiya work with the speed of the police | पालिकेकडून नालेसफाईचे काम धिम्या गतीने

पालिकेकडून नालेसफाईचे काम धिम्या गतीने

Next

मुंबई : पावसाळ्याला अवघे दोन महिने उरले असताना नालेसफाई यावर्षीही धिम्या गतीनेच सुरु असल्याचे चित्र आहे. दरवर्षी १० एप्रिलनंतर सुरू होणारी नालेसफाईने यंदा १ एप्रिलचा मुहूर्त गाठला. पण नालेसफाईचे काम अद्यापही एप्रिल फूलचं ठरले आहे. गेल्या २० दिवसांमध्ये जेमतेम २० टक्केचं काम झाले आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.

नाल्यांमधील गाळ न काढल्यास पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होती. याचे अनेक अनुभव गेल्या काही पावसाळ्यात आल्यानंतर महापालिकेने वर्षभर नाल्यांमधील गाळ काढत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन टप्प्यांत नालेसफाई करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत ७० टक्के काम केले जाणार आहे.

१ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यात १५ टक्के काम होणार आहे. १ आॅक्टोबर ते ३१ मार्च २०२० पर्यंत तिसºया टप्प्यात उर्वरित १५ टक्के काम केले जाणार आहे. यानुसार पावसाळापूर्व ७० टक्के कामातील २० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र पालिकेचा हा वेग पाहता पावसाळ्यापूर्वी नियोजित गाळ काढणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. तर अशा आकडेवारी म्हणजे मुंबईकरांच्या डोळ्यांत धूळफेकचं ठरत आहे.

रोबोटची ताकद वाढणार
शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी पालिकेने रोबोटचे सहाय्य घेतले आहे. रोबोटच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू आहे. मात्र अनेक वर्षांपासून जुन्या नाल्यांमध्ये साठलेला गाळ, मोठे दगड यामुळे रोबोटच्या कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे या रोबोटची तांत्रिक क्षमता वाढवण्यात येणार आहे.

असे होते काम
दीड मीटरपेक्षा जास्त रुंद असणाºया नाल्यांची सफाई पर्जन्यजल वाहिन्या विभागाकडून केली जाते. तर दीड मीटरपेक्षा कमी रुंदी असलेल्या नाल्यांच्या सफाईचे काम विभाग कार्यालयाकडून केले जात आहे.

Web Title: Nalasaiya work with the speed of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.