एन. अंबिका यांची मुंबई पोलिसांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:34 AM2020-08-19T04:34:36+5:302020-08-19T04:34:46+5:30

एन. अंबिका यांची मुंबई पोलिसांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारला.

N. Ambika appointed as Mumbai Police spokesperson | एन. अंबिका यांची मुंबई पोलिसांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती

एन. अंबिका यांची मुंबई पोलिसांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती

Next

मुंबई : पोलीस मुख्यालय २ च्या पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांची मुंबई पोलिसांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारला. मुळच्या तामिळनाडूतील एका खेड्यात जन्मलेल्या एन. अंबिका या आयपीएस अधिकारी बनून २००९ मध्ये पोलीस दलात दाखल झाल्या. त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून अकोला, जळगावमध्ये जिगरबाजपणे कामगिरी बजावली.
पुढे त्या हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक बनल्या. नाशिक शहर पोलीस दलामध्ये पोलीस उपायुक्त म्हणून धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर त्यांची मुंबईत बदली करण्यात आली. मे २०१६ पासून त्या मुंबई पोलीस दलात रुजू झाल्या.
परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुंतागुंतीच्या, गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्यानंतर बदली होऊन मुंबई पोलीस मुख्यालयात उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आदेशाने आता त्यांची मुंबई पोलिसांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: N. Ambika appointed as Mumbai Police spokesperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.