Join us

Video : काँग्रेस अभी जिंदा है.... अंगावर काटा आणणारा 'माय नेम इज रागा'चा टीजर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 21:30 IST

जिस राहुल का लोगों ने मजाक बनाया, वही राहुल आज उन्ही लोगों का रागा है...

मुंबई - निवडणुकांच्या तोंडावर राजकीय व्यक्ती आणि परिस्थितीवर आधारित चित्रपटांची चलती सुरू आहे. त्यातच, आता माय नेम इज रागा हा राहुल गांधींच्या व्यक्तिरेखेला धरून असलेला चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून अंगावर रोमांच उभा करणारा हा टीझर आहे. 

काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भूमिकेवर आधारित 'माय नेम इज रागा' हा चित्रपट निवडणुकांच्या तोंडावर प्रदर्शित होऊ शकतो. पापा, क्या आप भी मार दिये जाओगे...., काँग्रेस अभी जिंदा है... मै अगर इस देश के लिए फेल भी हो जाऊ तो मेरे लिए बडे गर्व की बात है... यांसारखे डायलॉग प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. नुकतेच, ठाकरे, द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर विवेक ओबेरायची भूमिका असलेला नरेद्र मोदींवरील चरित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यातच, निवडणुकांच्या गरमा-गरमीच्या हंगामात प्रेक्षकांना राहुल गांधीही चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत.   

जिस राहुल का लोगों ने मजाक बनाया, वही राहुल आज उन्ही लोगों का रागा है.... असं म्हणणारी ती सुंदर युवती कोन असाही प्रश्न हा टीझर पाहिल्यानंतर उपस्थित होतो. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा डोळा मारतात. काँग्रेस, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधी, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, मोदी यांसह अनेक राजकीय आणि कौटुंबिक पैलू या 4 मिनिटांच्या टीझरमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात अश्विनी कुमार यांनी गांधींची भूमिका केली आहे. तर हिंमत कपाडिया यांनी नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. तर राजू खेर यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भूमिका केली आहे. दरम्यान, इंडियन इंटरनेट प्रेसेंट आणि रुपेश पॉल दिग्दर्शित 'माय नेम इज रागा' या चित्रपटाची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट राहुल गांधींची प्रतिमा सुधारणे किंवा खराब करणे असा नसून एका व्यक्तीची करण्यात येणारी बदनामी, तरीही त्या व्यक्तीमधील चांगुलपणा, ह्युमन बिंग दर्शवत असल्याचं दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी म्हटलं आहे. 

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :राहुल गांधीआत्मचरित्रराजकारणकाँग्रेस