संग्रहालये ही संस्कृतीची प्रतीके; डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 05:55 IST2025-01-09T05:55:14+5:302025-01-09T05:55:52+5:30

राणीबागेतील नूतनीकरण केलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Museums are symbols of culture; Dr. Bhau Daji Lad Museum inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis | संग्रहालये ही संस्कृतीची प्रतीके; डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

संग्रहालये ही संस्कृतीची प्रतीके; डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शहरांतील संग्रहालये ही संस्कृती आणि इतिहासाची प्रतीके असतात.  समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीची साक्षीदार असलेली ही संग्रहालये म्हणजे त्या शहराची श्रीमंती असते.  त्यामुळे  भावी पिढीला आपला संपन्न इतिहास, वारसा सांगण्यात डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयही मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. 

भायखळा  येथील राणीबागेच्या  आवारातील नूतनीकरण केलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय वास्तूचे उद्घाटन  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री  मंगल प्रभात लोढा, खा. मिलिंद देवरा, पालिका आयुक्त  भूषण गगराणी उपस्थित होते.  

डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय नामकरणाच्या ५० वर्षांनंतर नव्या रूपात, दिमाखात खुले करताना मोठा आनंद होत आहे. पर्यटकांसाठी हे संग्रहालय कायम आकर्षण राहिले आहे आणि यापुढेही राहील. यातील दुर्मीळ वस्तू, छायाचित्रे, शिल्पाकृती या माध्यमातून नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळेल, असा विश्वासही  फडणवीस यांनी व्यक्त केला. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रास्ताविकातून संग्रहालय नूतनीकरणामागील भूमिका स्पष्ट केली. तर उपआयुक्त (उद्याने) चंदा जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आपला देश ही संस्कृतीची खाण

आपला देश संस्कृतीची खाण आहे. जगातील सर्वांत जुनी म्हणजेच १० हजार वर्षांपूर्वीची विकसित अवस्थेतील सिंधू संस्कृती स्थित्यंतरांना सामोरे जात आजही नांदते आहे. आक्रमणांमुळे व अनास्थेमुळे आपण ऐतिहासिक वारशांचे जतन करू शकलो नाही. पुरातन, ऐतिहासिक, कलात्मक वास्तूंचे जतन, संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: Museums are symbols of culture; Dr. Bhau Daji Lad Museum inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.