लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळेत सतत दादागिरी करतो म्हणून तीन वर्गमित्रांनी शाळकरी मुलाची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिल्याची घटना भांडुपमध्ये घडली. सिद्धार्थ लोंढे (१४), असे मृत मुलाचे नाव आहे. तो आठवीत शिक्षण घेत होता.
२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सिद्धार्थ याला वडील ओरडले होते. तेव्हापासून राग मनात धरून होता. दुपारी कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर तो ३ वाजताच्या सुमारास खेळायला जातो, असे सांगून तो घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी आला नसल्याने आई-वडिलांनी परिसरात त्याचा शोध घेत त्याचे मित्र आणि नातेवाइकांकडे चौकशी केली; पण तो सापडला नाही. सिद्धार्थच्या आईने भांडुप पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा हरविल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू होता. दुसऱ्या दिवशी विहार लेक तलावात सिद्धार्थचा मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज होता. परंतु राजावाडीतील शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर मार लागल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तपासाची दिशा बदलली.
अन् हत्येचा उलगडा... घटनेच्या वेळी सिद्धार्थ याचा याच परिसरातील १४ वर्षीय मित्रासोबत असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या संशयित मित्राला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणून चौकशी करताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. सिद्धार्थच्या मित्राने हत्येची कबुली देत अन्य दोन मित्र त्यावेळी गुन्ह्यात सोबत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मित्रांना टेंभीपाडा येथून ताब्यात घेतले. सिद्धार्थच्या डोक्यात काठीने प्रहार करून त्याला ठार करून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
Web Summary : In Bhandup, three classmates murdered an eighth-grader for constant bullying. They struck him with a stick and disposed of his body in a lake. Police investigation revealed the crime after the body was found.
Web Summary : भांडुप में, लगातार दादागिरी करने पर तीन सहपाठियों ने आठवीं कक्षा के छात्र की हत्या कर दी। उन्होंने उसे एक छड़ी से मारा और उसके शव को एक झील में फेंक दिया। पुलिस जांच में शव मिलने के बाद अपराध का खुलासा हुआ।