वरळीत मोबाइल चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST2021-04-20T04:07:29+5:302021-04-20T04:07:29+5:30

चाैघांना अटक; पसार आराेपीचा शाेध सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वरळीत मोबाइल चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची ...

Murder of a youth on suspicion of mobile theft in Worli | वरळीत मोबाइल चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या

वरळीत मोबाइल चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या

चाैघांना अटक; पसार आराेपीचा शाेध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वरळीत मोबाइल चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी हातात काहीही पुरावा नसताना अवघ्या काही तासांतच गुन्ह्याचा उलगडा करुन, चौघांंना अटक केली. पसार आरोपीचा शोध सुरू आहे.

वरळी येथील एस. के. अहिरे मार्गावरील खाऊ गल्लीत तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानुसार वरळी पोलीस तेथे दाखल झाले. तरुणाचा मृत्यू झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान चौधरी, पोलीस शिपाई स्वप्नील डेरे, स्वप्नील गुरव यांनी तपास सुरू केला. मृत व्यक्तीची ओळख न पटल्याने आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

प्राथमिक चौकशीत रविवारी पहाटे ४ ते ६ च्या सुमारास मोबाइल चोरीच्या संशयातून ५ जणांनी लाकडी बांबू तसेच लोखंडी सळईने तरुणाला मारहाण केली. यात त्याची हत्या झाल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तपासाअंती चौघांंना अटक केली असून पसार आरोपीचा शोध सुरू आहे.

........................................

Web Title: Murder of a youth on suspicion of mobile theft in Worli