हत्येप्रकरणी दुकलीला २४ तासात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 22:58 IST2018-06-29T22:57:35+5:302018-06-29T22:58:02+5:30
मालाड पश्चिम येथील लिंक रोडवरील इनऑर्बिट मॉलसमोर काल दुपारी २.४५ वाजता २८ वर्षीय सागर पुजारी या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी २४ तासात जितू आणि निलेश या दोन आरोपींना आज दुपारी अटक केली आहे.

हत्येप्रकरणी दुकलीला २४ तासात अटक
मुंबई - मालाड पश्चिम येथील लिंक रोडवरील इनऑर्बिट मॉलसमोर काल दुपारी २.४५ वाजता २८ वर्षीय सागर पुजारी या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली. या प्रकरणी बांगूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी २४ तासात जितू आणि निलेश या दोन आरोपींना आज दुपारी अटक केली आहे.
बांगूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी हि कारवाई केली आहे. काल सागर लिंक रोडवरून जात असताना जितू आणि निलेश त्याचा पाठलाग करता धारदार शस्त्राने सागरच्या छातीवर वार केले. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला होता. या जीवघेण्या हल्ल्यात सागरचा मृत्यू झाला. या प्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२, २०१, ३४ अन्वये दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर पलायन करण्याच्या बेतात असलेल्या जितू आणि निलेश या दोन आरोपींना आज दुपारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही हत्या या दोघांनी का केली याबाबत पोलीस अधिक चौकशी पोलीस करीत आहेत.