मुंबईत पदपथावर झोपण्याच्या वादातून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:10 IST2021-02-18T04:10:07+5:302021-02-18T04:10:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पदपथावर आपल्या जागेवर झोपला म्हणून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना जे. जे. मार्ग पोलिसांच्या ...

Murder over a dispute over sleeping on the sidewalk in Mumbai | मुंबईत पदपथावर झोपण्याच्या वादातून हत्या

मुंबईत पदपथावर झोपण्याच्या वादातून हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पदपथावर आपल्या जागेवर झोपला म्हणून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना जे. जे. मार्ग पोलिसांच्या चौकशीतून उघडकीस आली आहे. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा उलगडा करत आरोपी फिरोज खान (वय २५) याला बेड्या ठोकल्या आहेत. यात मृत तरुणाची ओळख अद्याप पटली नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

जे जे मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे. जे मार्ग रुग्णालय येथील गेट क्रमांक १२ च्या शेजारील पदपथावर मंगळवारी चारच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वी त्यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला.

परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पथकाने तपास सुरू केला. यात, खान याने हत्या केल्याचे स्पष्ट होताच त्याला पोलिसांनी नागपाड्यातील अरब गल्लीतून अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मृत व्यक्ती त्याच्या पदपथावरील नेहमीच्या जागेवर झोपला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागात सिमेंट काँक्रीटचा दगड त्याच्या डोक्यात घातला आणि तो तेथून निघून गेल्याचे सांगितले.

...................

Web Title: Murder over a dispute over sleeping on the sidewalk in Mumbai