उत्तर प्रदेश पोलिसांनी परवाना दिलेल्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकरांची हत्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 02:36 PM2024-02-09T14:36:17+5:302024-02-09T14:36:50+5:30

मॉरिसने त्याचा खाजगी अंगरक्षक अमरिश मिश्रा याच्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळी चालवली

Murder of Abhishek Ghosalkar with a gun licensed by Uttar Pradesh Police? | उत्तर प्रदेश पोलिसांनी परवाना दिलेल्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकरांची हत्या?

उत्तर प्रदेश पोलिसांनी परवाना दिलेल्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकरांची हत्या?

मुंबई - Abhishek Ghosalkar Murder ( Marathi News ) ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नावाच्या आरोपीने गोळ्या झाडून हत्या केली. या गोळीबारानं दहिसर परिसर हादरला. नेमकं मॉरिसकडे हे बंदूक कुठून आले, त्याचा परवाना होता का याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यात आता नवीन माहिती समोर आली आहे. 

मॉरिसने त्याचा खाजगी अंगरक्षक अमरिश मिश्रा याच्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळी चालवली. या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. अमरिश मिश्रा यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमरिश मिश्रा हा मॉरिसचा खासगी अंगरक्षक होता. त्याने उत्तर प्रदेशातील फुलपूर येथून बंदुकीचा परवाना मिळवला होता हे तपासात उघड झाले आहे. मिश्रा हा मुंबईत मॉरिसचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. 

विशेष म्हणजे अमरीश मिश्रा ही बंदूक मॉरिसच्या कार्यालयात काम झाल्यानंतर ठेवायचा. याच बंदुकीचा वापर मॉरिसने अभिषेकची हत्या करण्यासाठी केला. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना महाराष्ट्र पोलिसांनी दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मुंबई पोलीस अमरिश मिश्राची चौकशी करत आहेत. या चौकशीत अमरिशने मी बॉडीगार्ड म्हणून काम करतो आणि काम झाल्यानंतर बंदूक मॉरिसच्या कार्यालयात ठेवतो असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणात आणखी माहिती गोळा करत आहेत.

पिस्तुलाचे लायसन्स देण्याबाबत विचार करणार

दरम्यान, या घटनेबाबत बऱ्याच गोष्टी पोलिसांसमोर आल्या आहेत. त्या योग्यवेळी उघड करण्यात येतील. जी काही कारणे लक्षात येतायेत ती वेगवेगळी आहेत. त्या कारणांची खातरजमा केल्यानंतर आपल्यासमोर माहिती ठेवण्यात येईल. ही घटना गंभीर आहे अशा घटनांचे राजकारण करणे योग्य नाही. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था संपलेला आहे अशी विधाने करणे योग्य नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडली आहे. तथापि, याबाबत बंदूक असेल, लायसन्स असतील, बंदुक कुठून आली, लायसन्स देताना आणखी काही खबरदारी घेतली पाहिजे का याबाबत राज्य सरकार निश्चित विचार करेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Web Title: Murder of Abhishek Ghosalkar with a gun licensed by Uttar Pradesh Police?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.