पालिकेने आठ हजार बॅनर हटवले, जाहिरातींसाठी सार्वजनिक मालकीच्या जागांचा अधिक वापर; लवकरच कारवाईला अधिक वेग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:44 IST2025-12-28T13:40:44+5:302025-12-28T13:44:36+5:30

जाहिरातींसाठी सार्वजनिक मालकीच्या जागांचा अधिक वापर; लवकरच कारवाईला अधिक वेग...

Municipality removes eight thousand banners, more use of public property for advertisements; action to be taken soon | पालिकेने आठ हजार बॅनर हटवले, जाहिरातींसाठी सार्वजनिक मालकीच्या जागांचा अधिक वापर; लवकरच कारवाईला अधिक वेग 

पालिकेने आठ हजार बॅनर हटवले, जाहिरातींसाठी सार्वजनिक मालकीच्या जागांचा अधिक वापर; लवकरच कारवाईला अधिक वेग 


मुंबई :  खासगी आणि सरकारी जागांपेक्षा सार्वजनिक मालकीच्या जागांवर पोस्टर, बॅनर आणि होर्डिंग लावण्याची संख्या जास्त  आहे. खासगी जागांवर जाहिरातबाजीसाठी संबंधित सोसायट्या किंवा आस्थापनांना शुल्क द्यावे लागत असल्याने ‘फुकट’च्या सार्वजनिक किंवा सरकारी जागा बऱ्या, याकडे जाहिरात बहाद्दरांचा कल अधिक दिसून येत आहे. मुंबई महापालिका  निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे आठ हजारांपेक्षा अधिक जाहिराती हटवल्या असून, त्यापैकी सर्वाधिक जाहिराती या सार्वजनिक जागेवर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईतील सर्व २४ विभागांमध्ये जाहिरातीचे साहित्य हटवण्याचे  काम सुरू आहे. 

आचारसंहिता लागू झाल्यानंतरच्या पहिल्या २४ ते ४८ तासांत पालिकेने शहराच्या विविध भागांतून २,१०३ पेक्षा जास्त अनधिकृत राजकीय जाहिरात साहित्य हटवले होते. त्यानंतरच्या पुढल्या दिवसात  या कारवाईला आणखी वेग देण्यात आला. 

या ठिकाणी बडगा 
सरकारी जागेवरील कारवाई
खराब केलेल्या भिंती    १७ 
पोस्टर    ११२ 
बॅनर     १७८ 
एकूण     ३०७

२ हजार पेक्षा अधिक अनधिकृत राजकीय बॅनर

सार्वजनिक मालमत्ता 
खराब भिंती    २७ 
पोस्टर    ९२५ 
होर्डिंग    ६९८ 
बॅनर    ४८७३ 
अन्य    १३९०  
एकूण    ७६५१ 

खासगी मालमत्ता  
भिंत खराब करणे    १४४ 
पोस्टर    ३६ 
होर्डिंग    ६
बॅनर    ७७ 
झेंडे    १०५ 
अन्य    ४४२ 
एकूण    ३६८ 
 

Web Title : मुंबई: पालिका ने हटाए 8 हजार बैनर, सार्वजनिक जगहों पर विज्ञापन ज़्यादा।

Web Summary : मुंबई में चुनाव आचार संहिता के बाद पालिका ने 8,000 से ज़्यादा विज्ञापन हटाए, जिनमें सार्वजनिक जगहों पर लगे विज्ञापन अधिक थे। निजी संपत्ति शुल्क से बचाव।

Web Title : Mumbai Removes 8,000 Banners, Public Spaces Favored for Ads.

Web Summary : Mumbai removed 8,000+ ads post-election code, mostly from public spaces, avoiding private property fees. Action intensifies across 24 city divisions.