The municipality pumped out as much water as Tulsi lake in four days | तुळशी तलावाएवढे पाणी चार दिवसात पालिकेने उपसले

तुळशी तलावाएवढे पाणी चार दिवसात पालिकेने उपसले

मुंबई : मुंबईला पावसाने झोडपून काढले असून, येथील सखल भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी मुंबई महापालिकेने ठिकठिकाणी उपसा पंप लावले होते. आणि या उपसा पंपांच्या माध्यमातून गेल्या ४ दिवसांत तब्बल १ हजार ७१४ कोटी लीटर एवढ्या पाण्याचा उपसा करण्यात आला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या वेगाने आणि एवढ्या क्षमतेने पाण्याचा उपसा करूनही बहुतांश वेळा मुंबई ठप्पच पडली होती. ३ आॅगस्ट रोजी संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून ते ६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या साधारपणे ४ दिवसांच्या कालावधीत सर्व उदंचन केंद्रामधून तब्बल १७ हजार १४५ दशलक्ष लीटर (१,७१४.५० कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा उपसा करण्यात आला, असा दावा पालिकेने केला आहे.  ८ हजार ४६ दशलक्ष लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या तुळशी तलावातील पाण्याच्या दुपटीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा गेल्या ४ दिवसांत करण्यात आला आहे.

अतिवृष्टीच्या काळात पडणाºया पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ६ उदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन) कार्यरत आहेत. केंद्रामध्ये एकूण ४३ पंप आहेत. यापैकी प्रत्येक पंपाची क्षमता प्रति सेकंदाला ६ हजार लीटर पाण्याचा उपसा करण्याची आहे. सर्व पंपांची एकत्रित क्षमता ही प्रत्येक सेंकदाला २ लाख ५८ हजार लीटर एवढ्या पाण्याचा उपसा करण्याची आहे.

संगणकीय प्रणाली ६ उदंचन केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या पंप हे ३ ते ६ आॅगस्ट या ४ दिवसांच्या कालावधी दरम्यान सर्व पंपांचा एकत्रितरीत्या विचार केल्यास एकूण ८७० तास व २३ मिनिटे कार्यरत होते. सर्व ६ उदंचन केंद्रांमध्ये कार्यरत असणारे ४३ पंप हे उदंचन केंद्रांमध्ये वाहून येणाºया पावसाच्या पाण्याचा प्रमाणानुसार संगणकीय प्रणालीद्वारे कार्यरत होतात.

६ उदंचन केंद्रे कार्यरत असून यात ४३ पंप कार्यरत : हे पंप संगणकीय प्रणालीद्वारे कार्यरत हाजीअली लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड बंदर (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड), ईर्ला (जुहू), गजदरबंध (सांताक्रुझ)
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The municipality pumped out as much water as Tulsi lake in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.