महापालिका लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 03:15 AM2021-02-08T03:15:26+5:302021-02-08T03:15:54+5:30

लसीकरण प्रक्रियेला वेग येण्यासाठी निर्णय

Municipal will increase the capacity of vaccination centers | महापालिका लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविणार

महापालिका लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग येण्यासाठी लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहर उपनगरात लवकरच लसीकरण केंद्रांची क्षमता वाढवून ७२ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईत आतापर्यंत ७५ हजार ७५१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले असून आता दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरणही सुरू कऱण्यात आले आहे. 

  पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, नऊ लसीकरण केंद्रांपासून सुरुवात करण्यात आली, आता शहर उपनगरात २१ लसीकरण केंद्र आहेत. २५ केंद्रांचे काम सुरू असून लवकच ७२ लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले, या प्रक्रियेला वेग येण्यासाठी आता पालिकेचा चमू स्वतः पोलीस, सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे.

मुंबईमधील लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळांमध्येही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. 
तथापि, शाळांमध्ये आवश्यक ती सर्वच वैद्यकीय यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात गरज भासली तरच पालिका शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार आहे.

प्रतिसाद ७० ते ७५%
केंद्रांची संख्या वाढल्यानंतर लसीकऱणाला मिळणारा प्रतिसाद ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत गेला आहे. या दोन्ही गटांतील लाभार्थ्यांचे लसीकरण एकत्रित केल्यामुळे कमी कालावधीमध्ये अधिक लसीकरण पूर्ण होणार आहे. मात्र हे करताना पालिकेच्या नियमित वैद्यकीय सेवांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ज्या ठिकाणी पुरेशी जागा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे, त्या ठिकाणी लसीकरण केंद्रांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयामधील नियमित वैद्यकीय सेवांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.

Web Title: Municipal will increase the capacity of vaccination centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.