"नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 01:44 AM2020-08-09T01:44:18+5:302020-08-09T01:44:41+5:30

विरोधी पक्षांची मागणी; मुंबापुरीची तुंबापुरी केल्याचा आरोप

"Municipal Corporation should blacklist non-cleaning contractors" | "नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकावे"

"नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांना महापालिकेने काळ्या यादीत टाकावे"

googlenewsNext

मुंबई : अतिवृष्टीमुळे मुंबईत पाणी तुंबत असल्याचा बचाव महापालिका प्रशासन करीत असले तरी विरोधकांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. नालेसफाई करणाºया ठेकेदारांच्या हातसफाईमुळेच मुंबईची तुंबापुरी झाली, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

तसेच कामचुकारपणा करणाºया ठेकेदारांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठवून दंडात्मक व काळया यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मंगळवार रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस झाला. सलग तीन दिवस पाऊस सुरू राहिल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. विशेषत: दक्षिण मुंबईत कधीही पाणी न भरलेला परिसर जलमय झाला. यासाठी भाजपने पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. त्यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षांनीही निशाणा साधला आहे. मुंबईत एका दिवसात जास्त पाऊस झाला, मात्र पावसाच्या पाण्याचा जलद गतीने निचरा का झाला नाही? असा सवाल विरोधकांनी केला आहे.

महापालिकेने नालेसफाईच्या कामावर ९० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र ठेकेदारांनी नाल्यांमधील गाळ नव्हे तर केवळ तरंगणारा कचरा काढला आहे. तसेच नाल्यातून काढलेला कचरा बाहेर काढून तसाच ठेवल्यामुळे पावसात तो कचरा पुन्हा नाल्यात वाहून गेला आहे.
परिणामी, नाले भरून अनेक भागांत पाणी तुंबले.
याप्रकरणी संबंधित ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवा, अशी मागणी विरोध पक्षांनी केली आहे.

महापालिकेतील विरोधी पक्षांनीही निशाणा साधला आहे. मुंबईत एका दिवसात जास्त पाऊस झाला, मात्र पावसाच्या पाण्याचा जलद गतीने निचरा का झाला नाही, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

Web Title: "Municipal Corporation should blacklist non-cleaning contractors"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.