Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाणी निचऱ्याची समस्या असलेल्या ८० ठिकाणी महापालिकेचे विशेष लक्ष; "पावसाळ्यापूर्वी कामे आवरा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:49 IST

महापालिकेच्या कामांसह मेट्रो आणि रेल्वे हद्दीत पाणी साचू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मुंबई - पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली असून, त्यादृष्टीने आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतली. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुंबईत सुमारे ८० ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा संथगतीने होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  त्यामुळे तेथे उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या.

‘मेट्रो, रेल्वे हद्दीत पाणी साचू नये, यासाठी सर्तक रहा’महापालिकेच्या कामांसह मेट्रो आणि रेल्वे हद्दीत पाणी साचू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, डॉ. अश्विनी जोशी, अभिजित बांगर, डॉ. अविनाश ढाकणे, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस उपायुक्त अकबर पठाण, तसेच मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक कैलास मीना उपस्थित होते.

विविध यंत्रणांच्या आढावा बैठकीतील प्रमुख निर्णयांवर दृष्टिक्षेप 

पाणी निचराशहर व उपनगरांतील ९३ ठिकाणी निचरा संथ; विशेष लक्षपाणी उपशासाठी ५४७ पंप प्रत्येक पंपचालकाकडून ‘स्मार्टफोन’द्वारे छायाचित्रे नियंत्रण कक्षाला पाठविणारतातडीच्या प्रतिसादासाठी १० फिरती डीवॉटरिंग पंप वाहनेमेट्रो रेल्वेच्या आवश्यकतेनुसार मरोळ नाका, शीतलादेवी, वरळी नाका, महालक्ष्मी तसेच माटुंगा, भांडुप, चुनाभट्टी आणि दादर येथे डीवॉटरिंग पंप. 

रस्ते व वाहतूक रस्ते विकासाची कामे ३१ मेपूर्वी सुरक्षित टप्प्यावर१५ मेपर्यंत कामांचा फेरआढावाखोदलेले चर भरून रस्ते पूर्ववत करण्याचे आदेशखड्डे दुरुस्तीसाठी परिमंडळनिहाय एजन्सी

मध्य रेल्वे मशीद बंदर व सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान सीमा भिंतीलगतच्या झोपड्यांचे स्थलांतर करावे.शीव-कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान पाण्याच्या जलद निचरासाठी  पंप बसवावेत.दादर, माटुंगा रोड स्थानकांवर पाणी साचणाऱ्या ठिकाणचे अडथळे दूर करा.

दरड कोसळणे२४९ दरडप्रवण क्षेत्रांपैकी ७४ ठिकाणे संवेदनशील, तर ४६ अतिसंवेदनशील. सार्वजनिक बांधकाम विभागाने ३२ अतिसंवेदनशील ठिकाणांचा अहवाल तयार केला आहे. स्थानिक रहिवाशांचे नजीकच्या शाळांमध्ये स्थलांतर करावे.म्हाडा, बांधकाम विभागाने ९ मीटरपेक्षा अधिक उंचीची संरक्षण भिंत उभारावी.

मेट्रो रेल्वे (ॲक्वा लाइन)मेट्रो स्थानकांच्या ठिकाणी पाणी उपसणाऱ्या पंपांची क्षमता वाढवणार.गरज भासल्यास स्थानकांजवळील प्रवेशिका मार्ग येथे अतिरिक्त पंप.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: BMC focuses on waterlogging spots, pre-monsoon work deadline.

Web Summary : Mumbai's BMC is prioritizing pre-monsoon work, focusing on 80 waterlogging spots. Measures include deploying pumps, coordinating with Metro and Railways, and addressing landslide-prone areas for resident safety before monsoon.
टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाऊस