मुंबईत लाचखोरीत महापालिका आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:15 IST2023-11-24T12:14:50+5:302023-11-24T12:15:14+5:30
२०२२ मध्ये पालिकेत लाचखोरीचे सर्वाधिक १९ गुन्हे नोंद झाले

मुंबईत लाचखोरीत महापालिका आघाडीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लाचखोरीत मुंबईत महापालिका आघाडीवर असून पोलिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये गेली पाच वर्षांत पालिकेशी संबंधित लाचखोरीचे ८८ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यापाठोपाठ पोलिस खात्याचा क्रमांक लागतो.
२०२२ मध्ये पालिकेत लाचखोरीचे सर्वाधिक १९ गुन्हे नोंद झाले. गेली पाच वर्षांत राज्यात एसीबीचे १४ हजार ३३० गुन्हे नोंद झाले. यामध्ये गेल्या वर्षी अवघे ३३ टक्के गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.
विभाग गुन्हे
पालिका ८८
पोलिस ४९
आरोग्य ७
शिक्षण ३