मुंबई महापालिका निवडणुकीची मतमोजणी जशी पुढे सरकत आहे, तसे धक्कादायक निकाल समोर येत आहेत. जरी सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आघाडीवर असल्याचे दिसत असले, तरी वैयक्तिक पातळीवर शिंदे गटाच्या दोन मोठ्या खासदारांना मुंबईकरांनी मोठा झटका दिला आहे. जोगेश्वरी आणि धारावी या दोन्ही महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये खासदारांच्या जवळच्या नातेवाईकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई महानगरपालिका निकालाचे सर्व अपडेट्स इथे पहा Live
रवींद्र वायकरांच्या कन्येचा जोगेश्वरीत पराभव
जोगेश्वरी पूर्व या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या बालेकिल्ल्यात खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर-पोतनीस यांचा पराभव झाला आहे. वॉर्ड क्रमांक ७३ मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत ठाकरे गटाच्या उमेदवार लोना राजेंद्रसिंह रावत यांनी दीप्ती वायकर-पोतनीस यांना धूळ चारली. वायकर कुटुंबासाठी हा तिसरा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर केवळ ४८ मतांनी विजयी झाले होते, मात्र त्यानंतर विधानसभेला त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचा पराभव झाला आणि आता महापालिकेत मुलीलाही मतदारांनी नाकारले आहे.
ठाकरे गटाची बालेकिल्ल्यात पकड मजबूत
जोगेश्वरी पूर्व हा भाग ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दीप्ती वायकर यांच्या माध्यमातून वायकर कुटुंबाने या भागावर पुन्हा पकड मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण ठाकरे गटाच्या लोना रावत यांनी त्यांना यशस्वी होऊ दिले नाही. या निकालांमुळे शिंदे गटाच्या खासदारांच्या स्थानिक प्रभावावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Web Summary : The Waikar family faces another political setback as Ravindra Waikar's daughter loses the Mumbai municipal election. This follows previous defeats for his wife and a narrow Lok Sabha victory, raising questions about the Shinde faction's local influence in Jogeshwari, a Thackeray stronghold.
Web Summary : वायकर परिवार को एक और राजनीतिक झटका लगा है क्योंकि रवींद्र वायकर की बेटी मुंबई नगरपालिका चुनाव हार गई हैं। इससे पहले उनकी पत्नी की हार और लोकसभा में मामूली जीत हुई थी, जिससे जोगेश्वरी में शिंदे गुट के स्थानीय प्रभाव पर सवाल उठ रहे हैं।