Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची गळती; सर्वाधिक घसरण कुठे, कोणत्या महापालिकेत किती घट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 07:19 IST

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. सगळ्या महापालिकांमधील लढतीचे अंतिम चित्रही स्पष्ट झालेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. सगळ्या महापालिकांमधील लढतीचे अंतिम चित्रही स्पष्ट झालेले आहे. परंतु, गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकांत राज्यातील बहुतांशी महापालिकांमध्ये उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याचे चित्र आहे. 

मागील निवडणुकीच्या तुलनेत काही शहरांत ही घसरण ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारण, निवडणूक खर्च, पक्षीय गणिते आणि प्रशासकीय अनिश्चितता यांचा थेट परिणाम लोकशाही सहभागावर होत असल्याचे हे आकडे सूचित करतात.

सर्वाधिक घसरण पनवेलमध्ये 

या आकडेवारीनुसार सर्वाधिक घसरण पनवेल येथे दिसून येते. पनवेल महापालिकेच्या मागील निवडणुकीत ४१८ उमेदवार रिंगणात होते. यंदा ही संख्या २५५ वर आली असून ३९ टक्के घट नोंदवली गेली आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर (३५.८०%), कल्याण-डोंबिवली (३४.८०%) आणि नवी मुंबई (२६.५०%) या शहरांचा क्रम लागतो. राज्याची राजधानी मुंबई येथेही उमेदवारांची संख्या २,२७५ वरून १,७०० वर आली असून सुमारे २५.३० टक्के घट झाली आहे. भिवंडी-निजामपूर आणि चंद्रपूर येथील महापालिकांमध्ये मात्र उमेदवार संख्येतील घट तुलनेत कमी अर्थात ५ टक्क्यांखाली आहे.  

उमेदवार संख्येत कोणत्या महापालिकेत किती घट? 

महानगरपालिकामागील निवडणूक२०२६ निवडणूकघट (%)
पनवेल४१८२५५३९.००
कोल्हापूर५०९३२७३५.८०
कल्याण–डोंबिवली७५०४८९३४.८०
नवी मुंबई६७९४९९२६.५०
मुंबई२,२७५१,७००२५.३०
मालेगाव३७४३०११९.५०
अकोला५७९४६९१९.००
ठाणे८०५६५६१८.५०
अहिल्यानगर३३९२८३१६.५०
सांगली–मिरज–कुपवाड४५१३८११५.५०
नांदेड–वाघाळा५७८४९११५.१०
मीरा–भाईंदर५०९४३५१४.५०
नागपूर१,१३५९९३१२.५०
लातूर४०७३५९११.८०
नाशिक८२१७३५१०.५०
पिंपरी–चिंचवड७७३६९२१०.५०
धुळे३५५३२०९.९०
उल्हासनगर४७९४३२९.८०
सोलापूर६२३५६४९.५०
छत्रपती संभाजीनगर९३३८५९७.९०
भिवंडी–निजामपूर४६०४३९४.६०
चंद्रपूर४६०४५१२.००

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fewer Candidates in Municipal Elections; Panvel Sees Largest Drop

Web Summary : Municipal elections see fewer candidates than before. Panvel shows the biggest drop (39%), followed by Kolhapur, Kalyan-Dombivli, and Navi Mumbai. Mumbai also sees a significant decrease. Bhivandi-Nizampur and Chandrapur have minimal decline in candidate numbers.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६राजकारणमहायुतीमहाविकास आघाडी