Join us  

मुंबापुरीला पावसाने धो धो धुतले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 1:36 PM

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारीदेखील पावसाचा जोर कायम राहिला.

ठळक मुद्देकुलाबा १५६.४सांताक्रूझ १९१.२

 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारीदेखील पावसाचा जोर कायम राहिला असून, सकाळी आठच्या नोंदीनुसार मुंबईत सरासरी १९१.२ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. महालक्ष्मी, कुलाबा, वांद्रेसह लगतच्या उपनगरातदेखील पावसाने मुसळधार हजेरी लावली असून, या पावसामुळे ठिकठिकाणी पडझड झाली आहे. सुदैवाने यात काही हानी झालेली नाही.

गुरुवारी सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार ते अतिजोरदार पावसामुळे हिंदमाता, वडाळा येथील सक्कर पंचायत चौक, सायन येथील एसआयईएस कॉलेज, धारावी रेस्टॉरंट, शेख मिस्त्री दर्गा रोड, पोस्टल कॉलनी, चेंबूर येथील टेबी ब्रीज, देवनार येथील बैंगनवाडी, अंधेरी सबवे, पोयसर सबवे, खार सबवे, मालाड सबवे आणि मिलन सबवे येथील सखल भागात पाणी साचले होते. महापालिकेने येथील पाण्याचा निचरा केल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, मुसळधार पाऊस सुरु असतानाच एकूण २८ ठिकाणी झाडे कोसळली. १२ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तर ५ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला.  ..........................

पाऊस मिमी

शहर १३०.४५पूर्व उपनगर ९४.५५पश्चिम उपनगर ११२.१५

..........................

कुठे पडला किती पाऊस

नरिमन पॉइंट १२९.४फोर्ट १४३.९७मांडवी फायर स्टेशन ११९.७८मेमनवाडा १३०.७८ग्रँट रोड १४१.७मलबार हिल १५६.९५मुंबई सेंट्रल १३८.१६वडाळा १४७.३१दादर १६२.३२धारावी १५३.३९वरळी १६४.३३हाजीअली १४४.७४वांद्रे १७९.५८मरोळ ४२.१८विलेपार्ले १६७.१अंधेरी १७९.७६वर्सोवा १६३.५३मालवणी ८३.३चिंचोळी ९३.४६मालाड ९९.०६गोरेगाव ९५.७४बोरीवली ९१.१४दहिसर ७२.३३कांदिवली ९७.४८कुर्ला ११०.९४चेंबुर १४४.९९विक्रोळी १०८.१७

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसमुंबईमानसून स्पेशल