Mumbai Local: मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, रविवारी लोकल प्रवासात मुंबईकरांचा होणार खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:27 IST2025-04-05T12:26:49+5:302025-04-05T12:27:34+5:30
Mumbai Mega Block on Sunday, April 6, 2025: रविवारी मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local: मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, रविवारी लोकल प्रवासात मुंबईकरांचा होणार खोळंबा
मुंबई - रविवारी मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत सुमारे चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत या स्थानकांदरम्यान धीम्या गाड्या जलद मार्गावर वळविल्या जातील. त्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तसेच विद्याविहार, कांजूर मार्ग आणि नाहूर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे.
हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहणार असल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या बोरिवली आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर, तसेच डाऊन जलद मार्गावर ४ तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री १२:१५ ते रविवारी पहाटे ४:१५ या कालावधीत असणार आहे. या कालावधीत बोरीवली आणि अंधेरी दरम्यान अप धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. या कालावधीत राम मंदिर स्टेशनवर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने कोणत्याही सेवा उपलब्ध नसणार आहेत. तसेच काही अप आणि डाऊन सेवा रद्द करण्यात येणार आहेत.